Chinchwad : अन्याय, अत्याचार सहन करणार नाही; बी.एड.च्या विद्यार्थ्यांनी घेतली सामुहिक शपथ

एमपीसी न्यूज : चिंचवड (Chinchwad) येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन पोवाडा, पाळणा, छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीत गायन, विविध किल्ल्यांची माहिती आदी कार्यक्रमाद्वारे संपन्न झाला.

महाविद्यालयातील बी.एड.चे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी आज समाजात स्त्रीयांवर होत असलेल्या अत्याचार बिमोड करण्यासाठी संविधानाच्या चौकटीत राहून यापुढे आम्ही अन्याय, अत्याचार सहन करणार नाही. भविष्यात शिक्षक झाल्यावर आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी कटीबद्ध राहू, अशी सामुहिक शपथ घेतली.

Karate trainees : कराटे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप

संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा समवेत मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. पौर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, डॉ. सुवर्णा गायकवाड, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. अस्मिता यादव, डॉ. अनामिका घोष, प्रा. हनुमंत कोळी, प्रा. रोहित आकोलकर, प्रा. नेहा देशपांडे, प्रा. गीता कांबळे, प्रा. मनिषा पाटील, प्रा. संतोष उमाटे, प्रा. सुशिल भोग आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यीनी मनिषा लोंढे, अर्चना महाजन यांनी केले. तर, आभार प्रा. अस्मिता यादव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.