Pradeep Bhide : वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

बातम्यांचा भारदस्त आवाज हरपला

एमपीसी न्यूज – गेली अनेक वर्षे आपल्या भारदस्त आवाजाने (Pradeep Bhide) प्रेक्षकांवर आधिराज्य गाजविणारे आणि 40 वर्षे दूरदर्शनवर वृत्तनिवेदन करणारे प्रदीप भिडे (वय 65) यांचे मंगळवारी मुंबईत निधन झाले.

प्रदीप भिडे यांच्या निधनाने ‘आजच्या ठळक बातम्या’असे सांगणारा एक भारदस्त आवाज बंद झाला. विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर प्रदीप भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली. प्रदीप भिडे यांनी ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर ते मुंबई दूरदर्शन केंद्रात वृत्तनिवेदक म्हणून नोकरीला लागले.

प्रदीप भिडे (Pradeep Bhide) यांनी ध्वनीमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरु केली होती. त्यातून त्यांनी जाहिरात, माहितीपट आणि लघुपट यावर काम करत आपला ठसा उमटविला. भिडे यांनी सुमारे दीड ते दोन हजार कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, निवेदन केले आहे.

राज्यात शिवसेना-भाजप सरकार 1995 मध्ये स्थापन झाल्यावर शिवाजी पार्कवर झालेला शपथविधी सोहळ्याचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आणि राष्ट्रपती,पंतप्रधानांच्या अनेक कार्यक्रमांचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.