Chinchwad: कौतुकास्पद ! ; शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे पुढचे सर्व मानधन कोरोनाच्या लढाईसाठी

एमपीसी न्यूज – शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला असून सामाजिक बांधिलकी जपत यापुढील 22 महिन्याचे नगरसेवकपदाचे सर्व मानधन कोरोनाच्या लढाईसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.  सात महिन्याचे एक लाख रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आणि उर्वरित महिन्यांपैकी एक लाख रुपयांचे मानधन ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘जनकल्याण’ समितीला आणि दोन स्वयंसेवी संस्थांना खासगी खात्यातील धनादेशाद्वारे दिले आहेत.

या निर्णयामुळे नगरसेविका चिंचवडे यांचे कौतुक होत आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले असून सात महिन्याचे दरमहा मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस वर्ग करण्याबाबत कळविले आहे.

कोरोनाने जगात थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोनामुळे काही जणांचा बळी गेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि स्थिर-स्थावर होण्यासाठी दिर्घ कालावधी लागणार आहे.

त्यापार्श्वभुमीवर शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी यापुढील दर महिन्याला मिळणारे 15 हजार रुपये मानधन हे 22 महिन्याचे 3 लाख 30 हजार रुपये कोरोनाच्या लढाईसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सात महिन्याचे एक लाख रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तर, उर्वरित महिन्यांपैकी एक लाखाचे मानधन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या निधीस आणि दोन स्वंयसेवी संस्थांना प्रशासकीय अडचण येऊ नये यासाठी खासगी खात्यातील धनादेशाद्वारे दिले आहेत.

सर्व मानधन कोरोनाच्या लढाईसाठी देणा-या त्या एकमेव नगरसेविका आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.