Chinchwad : मंडळांनो! आवाजाची पातळी सांभाळा अन्यथा…

डेसीबल मीटरवर नोंद करून पोलीस करणार कारवाई

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये (Chinchwad) ध्वनीपातळीपेक्षा जास्त आवाज होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सर्व गणेशोत्सव मंडळांना पोलिसांनी केले आहे. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आवाज झाल्यास संबंधित मंडळांवर कारवाई केली जाणार आहे.

लाडक्या बाप्पाला वाजतगाजत निरोप दिला जातो. मात्र, यावेळी मोठे ध्वनी प्रदूषण होते. यात ध्वनीपातळी निश्चित करून दिली आहे. या पातळीपेक्षा जास्त डेसीबलची नोंद झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात दीड, तीन, पाच, सात व नऊ दिवसांच्या बाप्पाला शांततेत निरोप देण्यात आला.

यात काही भागांमध्ये विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. वाजत गाजत काढलेल्या या मिरवणुकांमधून ढोल पथकांकडून दणदणाट झाला. या मंडळांच्या विसर्जन मार्गांवर स्थानिक पोलीस ठाण्याच्या अंमलदारांकडून नाॅइज लेव्हल (डेसीबल) मीटरवर ध्वनी पातळीची नोंद घेण्यात आली.

Chinchwad : विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाचे होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक असे एकूण 18 नाॅइज लेव्हल (डेसीबल) मीटर (Chinchwad) उपलब्ध आहेत. या मीटरचे रीकॅलीब्रेशन करून घेण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकांमध्ये याद्वारे आवाजाची पातळी तपासली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे सध्या 300 वाॅकीटाॅकी आहेत. गणेश विसर्जनानिमित्त आणखी 50 वाॅकीटाॅकी मागवण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील विसर्जन मिरवणूक मार्ग, घाट, गर्दीची ठिकाणे अशा ठिकाणी वाॅकीटाॅकी असलेले पोलीस नियुक्त करण्यात येणार आहेत.

विविध क्षेत्रांतील आवाजाची मर्यादा (डेसीबलमध्ये)

क्षेत्र : दिवसा – रात्री
औद्योगिक : 75 – 70
व्यावसायिक : 65 – 55
निवासी : 55 – 45
शांतता : 50 – 40

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.