Chinchwad : महापालिकेने बांधकामावरील बंदीप्रमाणे फटाक्यांवरही बंदी घालावी – राजेश अग्रवाल

एमपीसी न्यूज – मागील आठ दिवसांपासून (Chinchwad) पिंपरी-चिंचवड येथील हवेतील गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. यामुळे पिंपरी चिंचवड महपालिकेने काही कालावधीसाठी परिसरातील बांधकाम व्यवसायावर बंदी घातली आहे. मात्र केवळ बांधकाम व्यवसायावर बंदी न घालता फटाक्यांवरही बंदी घालावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांनी केली आहे.

राजेश अगरवाल यांनी केलेल्या मागणीनुसार, हद्दीत बांधकामावर बंदी पण फटाक्यांवर नाही – हा कोणता न्याय? पिंपरी चिंचवड भागात प्रदूषण पातळी धोकादायक रेषेच्या पुढे गेल्यामुळे महानगरपालिकेने वटहुकूम काढून सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी घातली आहे.

Dapodi : हातचलाखीने महिलेची सोनसाखळी पळवली

ह्या बंदीमुळे मजूर अड्डयावरील मजुरांची रोजी रोटी महापालिकेने हिरावून घेतली आहे. आधीच अडचणीत असलेल्या बांधकाम (Chinchwad) व्यवसाय ह्या बंदीमुळे अजून अडचणीत सापडला आहे. ह्या क्षेत्राशी संबधित सर्व अर्थचक्र थांबले आहे. सरकारला मिळणारा महसूल थांबला आहे.

पण हे सर्व पिंपरी चिंचवड महानगरपालिके ला मान्य आहे पण त्या पेक्षा भयानक प्रदूषण करणारे फटाक्यांवर बंदी नाही हा कोणता न्याय आहे. प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महपालिकेने सर्व प्रकारच्या फटाक्यांवर तबोडतोब बंदी आणावी व बांधकामावरील बंदी उठवावी अशी मागणी राजेश अगरवाल यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.