Chinchwad News : लक्ष्मण जगताप यांना अभिवादन करण्यासाठी चिंचवडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय शोकसभा

एमपीसी न्यूज – चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Chinchwad News) यांना अभिवादन करण्यासाठी उद्या (शनिवारी) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. या शोकसभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार भाई जगताप, माजी राज्यमंत्री व आरपीआयचे (आठवले गट) राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर, निवृत्त विभागीय आयुक्त व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त दिलीप बंड यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय आमदार व नेते उपस्थित राहणार आहेत.

Moshi : मोशीत खवय्यांना मिळणार ‘आपुलकी’चा स्वाद!

याशिवाय सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते (Chinchwad News) तसेच शहरातील विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व अन्य संस्था, संघटनांचे पदाधिकारीही आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.