Moshi : मोशीत खवय्यांना मिळणार ‘आपुलकी’चा स्वाद!

एमपीसी न्यूज – खवय्यांचे पदार्थांवर जिवापाड प्रेम असते, त्यांना (Moshi) खायला आणि खाऊ घालायला भयंकर आवडते, त्यासाठी ते नव-नवीन जागा शोधतात व आपल्या आप्तेष्टांना घेऊन जातात, मात्र तिथे गेले की व्हेज-नॉनव्हेजची अडचण येते; कारण दोन्ही जेवण एकाच छताखाली ते पण सरमिसळ न करता मिळणे कठीणच… पण काळजी करु नका तुमच्या या प्रॉब्लेमचे सोल्युशन घेऊन आले आहेत, मोशी येथील हॉटेल आपुलकी! अगदी नावाप्रमाणे आपुलकीने शुद्ध शाकाहारी व अस्सल मांसाहारी जेवण एकाच छताखाली तुम्हाला मिळणार आहे, तेही कसलीही सरमिसळ न करता!

‘हॉटेल आपुलकीचे’ मोशी येथे नुकतेच आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. यावेळी नितीन वाटकर, कुणाल साठे, बंडा नाना गावडे, नाना सावंत, संतोषभाऊ लांडगे, सुधीर काळजे, विशाल आहेर, गणेश गवळी, योगेश लोंढे, भूषण वर्पे, रवी पडवळ, एड निलेश आंधळे, मंगेश नढे, गणेश भुजबळ, अनिकेत तापकीर, दत्ता घेणंद, सम्राट फुगे, विजय भोसुरे, आबा नाईक आदी उपस्थित होते.

(तांबडा-पांढरा रस्सा)

मोशीकरांना आता त्यांची पार्टी किंवा सेलिब्रेशनसाठी बाहेर कुठे तऱी ऑथेन्टीक हॉटेल शोधण्याची गरज नाही, कारण आपुलकी तुमच्यासाठी व्हेज व नॉनव्हेज पदार्थांची भलीमोठी मेनू लिस्ट घेऊन आले आहे. आपुलकीची विशेषता सांगायची झाली तर ते दिलेला शब्द पाळतात त्यामुळे बिनधास्त तुम्ही आपल्या माणसांना (Moshi) आपुलकीत घेऊन जाऊ शकता.

झुणका भाकर अन मिरचीचा ठेचा..

आता पाहुया मेनू… तर मंडळी नॉन व्हेज प्रेमींसाठी अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, वजडी फ्राय, काळे मटण, चिकन थाळी, चिकन तंदुरी, स्पेशल दम बिर्याणी, आपुलकी स्पेशल चिकन थाळी, आपुलकी स्पेशल मटण थाळी, तर फिशमध्ये खास भिगवण स्पेशल मच्छी थाळी सुटलं ना…तोंडाला पाणी!

(काळे मटण)

हा झाला नॉन व्हेजचा मेनू. शाकाहारी खवय्यांनाही तोंडाला पाणी सुटेल असाच मेनू आपुलकीने ठेवला आहे. यात गावरान पद्धतीची मासवडी थाळी पिठलं ठेचा भाकरी/आपुलकी व्हेज थाळी (मेनू): दोन भाजी, एक सुकी भाजी, इंद्रायणी राईस, जिरा राईस, तसेच इतर बराच मेनू उपलब्ध आहे.

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड रा.स्व.संघातर्फे रविवारी सांगवी येथे मकरसंक्रांत उत्सव

(व्हेज थाळी)

याशिवाय प्रशस्त पार्किंग, सीसीटीव्ही सुविधा, फॅमिलीसाठी स्वतंत्र भारतीय बैठक व्यवस्था यामुळे बिनधास्त तुम्ही तुमच्या कुटुंबाला घेऊन जाऊ शकता. स्वच्छ स्वच्छतागृह, ऑनलाईन पेमेंट सुविधा. आता म्हणाल एवढ एकूण जायच तर आहे पण वेळ कुठे आहे? तेव्हा डोन्टवरी… तुम्हाला आपल्या पदार्थांचा आस्वाद आपुलकी अगदी आपुलकीने तुमच्या पर्यंत पार्सल द्वारा ही पोहचवू शकते. विशेष म्हणजे इंद्रायणीनगर वडमुखवाडी ते अलंकापुरम सोसायटीपर्यंत पार्सल सेवा… ती पण एकदम फ्री! मग वाट कसली पाहताय, जा आस्वाद घ्या आपुलकीचा किंवा घर बसल्या ऑर्डर करा स्वादिष्ट जेवण!

पत्ता – हॉटेल आपुलकी, व्हेज-नॉन व्हेज, जय गणेश साम्राज्य, शासकीय गोडाऊन मागे, खडी मशिन रोड, गट नंबर 448, मोशी

संपर्क : 9657564564

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.