Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड लघुउद्योग (Pimpri Chinchwad) संघटनेच्या 2023 दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ही दिनदर्शिका पाहिल्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी संघटनेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाचे कौतुक केले.

या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी अध्यक्ष सुरेशतात्या म्हेत्रे, उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, सहसचिव प्रवीण लोंढे, खजिनदार संजय ववले, संचालक संजय सातव, नवनाथ वायाळ, हर्षल थोरवे, भारत नरवडे, अतुल इनामदार, स्वीकृत संचालक माणिक पडवळ, संजय भोसले, श्रीपती खुणे, रमेश होले, सल्लागार बशीर तरासगार हे उपस्थित होते.

Chinchwad News : लक्ष्मण जगताप यांना अभिवादन करण्यासाठी चिंचवडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय शोकसभा

पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना ही गेल्या अनेक वर्षापासून दिनदर्शिकेचे (Pimpri Chinchwad) प्रकाशन करत आहे. या दिनदर्शिकेत सण-समारंभ, महत्त्वाच्या तिथी तसेच लघुउद्योजकांना टी.डी.एस., जी.एस.टी., प्रोफेशनल टेक्स इ. भरण्याच्या तारखांचा उल्लेख केलेला असून या दिनदर्शिकेचे पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील संघटनेच्या सर्व सभासदांना वितरण केले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.