Pune : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीतर्फे आदर्श महिलांना पुरस्कार

एमपीसी न्यूज : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीतर्फे (Pune) वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. जिजाऊ जयंती निमित्त लाल महाल येथे आदर्श महिला पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी बाल शाहिरांनी पोवाडे व एकपात्री प्रयोग सादर केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाळासाहेब दाभेकर, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, योगेश समेळ, संजय बहिरट, सुशील पवार, महिला अध्यक्ष संगीता भालेराव उपस्थित होते. यावेळी ऍड. कमल सावंत, प्रा. सुधा पाटील, राजश्री मंजिरे, भारती सोनवणे, लक्ष्मी शिवाजी डिंबले व इतर महिलांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन

कार्यक्रमाचे (Pune) सूत्रसंचालन ऍड. संध्या देशपांडे व राहुल तांबे यांनी केले. मुकेश यादव यांनी आभार प्रदर्शन केले. प्रशांत धुमाळ व मुकेश यादव, संदीप पाटील, युवराज देसले, गणेश यादव, बाळासाहेब अमराले, तानाजी शिरोळे, नारायण घुटे, मनीष काळे व विक्रमसिंह तौर, श्रुतिका पाडळे, भाग्यश्री बोरकर, अमोल मांढरे, योगेश खोपडे, आकाश भालेराव उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.