Chinchwad News : पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली – शरद पवार

एमपीसी न्यूज – पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या (Chinchwad News) पहाटेच्या शपथविधीचा फायदा एकच झाला. त्यामुळे राष्ट्रपती राजवट उठली, असे मोठे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पहाटेच्या शपथविधीबाबत तुम्हाला माहिती होते का असे विचारले असता ते म्हणाले, मी जे सांगितले ते समजणा-यांना समजते असे सूचक विधानही त्यांनी केले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी पिंपळेसौदागर येथे शरद पवार आले होते.

23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. हा शपथविधी शरद पवार यांच्या संमतीने झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

Chinchwad : धक्का लागला म्हणून चौघांनी केली तरुणाला मारहाण

त्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, त्यावेळी सरकार बनविण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला. राष्ट्रपती राजवट उठली. याबाबत बोलण्याची आवश्यकता नाही. असे (Chinchwad News) काही घडले नसते तर राष्ट्रपती राजवट उठली असती का, राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? तुम्हाला माहिती होते का असे विचारले असता ते म्हणाले, मी जे सांगितले ते समजणा-यांना समजते असे सूचक विधानही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.