Chinchwad News: सायन्स पार्क शनिवारपासून खुले; दहा वर्षाखालील बालकांसह जेष्ठांना प्रवेश नाही 

एमपीसी न्यूज – तब्बल दहा महिन्यानंतर पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क ( Pimpri chinchwad  Science park) नागरिकांसाठी खुले ( Open) होणार आहे. येत्या शनिवार (दि.30) पासून सायन्स पार्क प्रेक्षकांसाठी नियमितपणे सुरु होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Crisis), लॉकडाऊन ( Lockdown)  यामुळे 15 मार्च 2020 पासून सायन्स पार्क बंद होते. तब्बल दहा महिने हे पार्क बंद होते. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे.

अनलॉक पाचमध्ये अनेक पर्यटन, शैक्षणिक व धार्मिक स्थळे, विविध संग्रहालये सुरु करण्यात येत आहेत. यानुसार सायन्सपार्क देखील शनिवारपासून नियमितपणे सुरु होत आहे.

सायन्स पार्कला भेट देताना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. तर दहा वर्षाखालील बालके व ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. मास्क वापरणे बंधनकारक राहिल. प्रदर्शन पाहताना एकमेकांमध्ये योग्य अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.