House Break-In News : दिघी, तळेगावात दोन घरफोड्या; दीड लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – दिघी ( Dighi) आणि तळेगाव ( Talegaon) परिसरात दोन घरफोडीचे ( Burgalry) प्रकार उघडकीस आले आहेत. या दोन्ही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी एकूण एक लाख 63 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून ( Theft) नेला आहे. याबाबत बुधवारी (दि. 27) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

महेश बाबूलाल तापकीर (वय 37, रा. वडमुखवाडी, च-होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात ( Dighi Police station)  फिर्याद दिली आहे. तापकीर यांचे घर 26 जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते 27 जानेवारी सकाळी साडेसहा या कालावधीत कुलूप लाऊन बंद होते.

चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून 86 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

नितीनकुमार कृष्णकुमार सिंग (वय 31, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ( Talegaon Dabhade Police station) फिर्याद दिली आहे. सिंग यांचे घर 23 जानेवारी रोजी रात्री नऊ ते 26 जानेवारी सकाळी साडेअकरा या कालावधीत कुलूप लाऊन बंद होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडून घरातून 77 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.