Nashik News : नाशिक जिल्ह्यात 1 हजार 25 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु

एमपीसी न्यूज : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत  प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 1 लाख 11 हजार 824 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत 1 हजार 25  रुग्णांवर उपचार सुरु असून, आत्तापर्यंत २ हजार ४४  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी  डॉ .अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ७२, चांदवड १२, सिन्नर ८६, दिंडोरी २५, निफाड ९१, देवळा १०, नांदगांव २०, येवला ३७, त्र्यंबकेश्वर २२, सुरगाणा ०२, पेठ ०४, कळवण ०७,  बागलाण १३, इगतपुरी ०३, मालेगांव ग्रामीण २० असे एकूण ४२४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६८० मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १३६  तर जिल्ह्याबाहेरील ११ असे एकूण १ हजार २५१  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १ लाख १५  हजार ११९ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९६.३६,  टक्के, नाशिक शहरात ९७.७६  टक्के, मालेगाव मध्ये  ९३.३८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.४१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.१४  इतके आहे.

मृत्यु

नाशिक ग्रामीण ८०४  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार १३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७६  व जिल्हा बाहेरील ५१  अशा एकूण २ हजार ४४  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय 

◼️१ लाख १५  हजार ११९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ११ हजार ८२४  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  १  हजार २५१ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.१४  टक्के.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.