Pune News : ‘फ्युचरिस्टिक ट्रेंड्स इन एज्युकेशन’ परिषदेत राकेश मित्तल यांचा सत्कार

एमपीसी न्यूज : ‘फ्युचरिस्टिक ट्रेंड्स इन एज्युकेशन’ या विषयावरील राष्ट्रीय परिषद बुधवारी दिल्लीमध्ये पार पडली. या परिषदेत कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल यांचा सत्कार मालदीवचे शिक्षणमंत्री मरियम नासीर यांच्या हस्ते करण्यात आला.

परिषदेत कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्या डीबीए आणि पीएचडी विषयाच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. सेंटर ऑफ एज्युकेशनल डेव्हलपमेंट आणि कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी यांनी एकत्रितपणे ‘फ्युचरिस्टिक ट्रेंड्स इन एज्युकेशन’ या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती.

यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग’चे माजी अध्यक्ष सी.बी. शर्मा, मालदीवचे शिक्षणमंत्री मरियम नासीर, सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी, दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिनेश सिंग यांच्यासह अनेक शिक्षण तज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते. ही सहावी वार्षिक राष्ट्रीय परिषद होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.