Chinchwad News : नाना काटे यांच्यासाठी थेट कॅलिफोर्नियावरुन तीन लाख रुपये खर्च करून येणार मतदार

एमपीसी न्यूज : विधानसभेची पोटनिवडणूक लागली (Chinchwad News) असून उमेदवारांपेक्षा मतदारांनाच प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. मीडियाच्या माध्यमातून मतदार निवडणुकीच्या संदर्भात भावना व्यक्त करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरत आहे.  कैलास टिळे हे सध्या कॅलिफोर्नियात कामाच्या निमित्ताने असून या निवडणुकीत मतदान करण्यासाठी त्यांनी थेट चिंचवडमध्ये येऊन मतदान करण्याचे ठरविले आहे.

यासाठी ते पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. कैलास टिळक यांनी तब्बल तीन लाखाचे तिकीट काढले आहे. टिळक हे पिंपळे सौदागर येथे राहत असून नाना काटे यांच्या प्रेमापोटी मी या निवडणुकीत नानांना मतदान करण्यासाठी येत असल्याच्या भावना त्यांनी या व्हिडिओत व्यक्त केले आहेत.

Chinchawad Bye-Election: उद्धव ठाकरे आणि राहुल कलाटे यांच्यात फोनवर संभाषण; ठाकरे म्हणाले राहुल तुम्ही….

या व्हिडिओत ते सांगतात की, ‘नाना काटे यांच्या सारखे उत्तुंग नेतृत्व आणि काळाची पाऊले ओळखून विकासकामे करणारे व्यक्तिमत्व हे निवडून येणे ही काळाची गरज आहे.’ यासाठी आपण 26 फेब्रुवारीला नाना काटेंना मतदान करण्यासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

परदेशात असलेला विकास पिंपळे सौदागरमध्ये करून (Chinchwad News) दाखवणाऱ्या नाना काटेंना निवडून आणून संपूर्ण चिंचवडचा परिपूर्ण विकास घडवून आणायचा असेल तर मला सुद्धा याता सक्रीय सहभाग घ्यावा लागेल असे टिळक यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.