Chinchwad Bye-Election : राहुल कलाटे यांनी रणशिंग फुंकले! उद्धव ठाकरे, सचिन अहिर यांची शिष्टाई निष्फळ

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत रणशिंग फुंकले आहे.(Chinchwad Bye-Election) त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपर्कनेते सचिन अहिर यांच्या शिष्टाईला अपयश आले. कलाटे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेल्या राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसते.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून सुरुवातीपासून राहुल कलाटे यांना नाव आघाडीवर होते. कलाटे आणि नाना काटे यांच्यात उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली होती. परंतु, राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी नाना काटे यांच्या गळ्यात उमेदवारीचा माळ टाकली. ऐनवेळी महाविकास आघाडीकडून उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या राहुल कलाटे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

Chinchwad News : नाना काटे यांच्यासाठी थेट कॅलिफोर्नियावरुन तीन लाख रुपये खर्च करून येणार मतदार

कलाटे यांची चिंचवडमध्ये मोठी राजकीय ताकद आहे. मागीलवेळी 1 लाख 12 हजार मते घेतली होती. त्यामुळे कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी  महाविकास आघाडीने जोरदार प्रयत्न केले. कलाटे यांचे शिवसेनेतील पूर्वीचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, कलाटे यांचे जवळचे मित्र नवनाथ जगताप यांच्या माध्यमातून गळ घालत राष्ट्रवादीने कलाटे यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. पण, कलाटे यांची समजूत निघाली नाही.

त्यानंतर आज शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सचिन अहिर हे सकाळीच कलाटे यांच्या वाकड येथील जनसंपर्क कार्यालयात दाखल झाले. समजूत काढण्याचा प्रयत्न केला. (Chinchwad Bye-Election) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे करुन दिले. आपण कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेवू असे कलाटे यांनी जाहीर केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी तीनची मुदत संपली. पण, कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे ठाकरे, अहिर यांच्या शिष्टाईला यश आले नाही. आता कलाटे तिस-यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. कलाटे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने चिंचवडमध्ये तिरंगी लढत होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.