Chinchwad News: युवक काँग्रेसचे ‘रोजगार दो’ अभियान

नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगारनिर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्याची परिणती म्हणजे कोट्यवधी रोजगार नष्ट झाले आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने “रोजगार दो अभियान” राबवण्यात येत आहे. रोजगाराच्या प्रमुख मागणीसाठी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय “रोजगार दो अभियान समर्थन” क्रंमाकावर (7998799854) बेरोजगार युवकांकडून मिस्ड कॉल्स देऊन रोजगार दो अभियानास समर्थन देण्यात येत आहे. नवी सांगवीतील फेमस चौक आणि चिखलीतील मोरे चौक येथे आज (दि.9) आंदोलन करण्यात आले.

या उपक्रमाची माहिती देताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “युवकांसाठी वर्षाला 2 कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन देऊन मोदी सरकार दुसऱ्यावेळी सत्तेवर आले. पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे.

नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगारनिर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्याची परिणती म्हणजे कोट्यवधी रोजगार नष्ट झाले आहेत.

वस्तू सेवा कराच्या (GST) चुकीच्या अंमलबजावणीमूळे कुटीर- लघु-मध्यम क्षेत्राचे आणि उद्योगधंदयांचे पार कंबरडे मोडले गेले. याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली.

पंतप्रधान मोदी यांच्या 20 लाख कोटीच्या पॅकेजमधून बेरोजगार युवक, शेतकरी वा लघु-मध्यम उद्योगक्षेत्र, यापैकी कोणत्याही घटकास मदत झाली नाही.

पंतप्रधान मोदी यांनी दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मितीच्या आश्वासनाला जागून रोजगार निर्मितीवर लक्ष दिले पाहिजे. युवक हे निराश झाले आहेत. आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. केंद्र सरकारने रोजगारनिर्मितीची स्वत:ची जबाबदारी ढकलून चालणार नाही. तरुण हातांना काम हवे आहे.

रोजगार दो ! या मागणीसाठी युवांनी 7998799854 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा, असे आवाहन बंदी यांनी केले आहे. या प्रसंगी भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे, यश काटे, अर्णव कामठे, प्रथमेश कुंभार, ऋषिकेश खेडकर, मयुर तिखे, रोहित जगताप, अश्विन खामकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.