Talegaon News: कंपनीत कामाला म्हणून गेलेली व्यक्ती बेपत्ता

ते 4 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता कंपनीत कामाला गेले. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र त्यांचा शोध लागला नाही.

एमपीसी न्यूज – कंपनीत कामाला म्हणून गेलेली एक 58 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली आहे. कामाला जाण्यापूर्वी अथवा कामावरून सुटल्यावर बेपत्ता झाली, याबाबत चौकशी सुरू आहे. ही घटना 4 सप्टेंबर रोजी तळेगाव एमआयडीसी परिसरात घडली आहे.

सुरेश रामभाऊ शेटे (वय 58, रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) असे बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सुरेश यांचा मुलगा सोमनाथ शेटे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

बेपत्ता शेटे हे तळेगाव एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करतात. ते 4 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता कंपनीत कामाला गेले. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र त्यांचा शोध लागला नाही.

बेपत्ता सुरेश शेटे यांचे वर्णन पुढीलप्रमाणे –
उंची 5 फूट 5 इंच, दाढी पांढरी थोडी वाढलेली, अंगात पांढरा शर्ट, डोक्यावर पांढरी गांधी टोपी, रंग गोरा, चेहरा गोल, शिक्षण नाही, मराठी भाषा बोलतात.

वरील वर्णनाच्या व्यक्तीबाबत काही माहिती मिळल्यास तळेगाव एमआयडीसी पोलिसांशी तसेच सुरेश शेटे यांचे नातेवाईक सोमनाथ शेटे (8796759294), सुनील शेटे (9764780753) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.