Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने आटारी सिमेवरील जवानांना बांधली राखी

एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमच रक्षाबंधन भारत-पाकिस्तानच्या आटारी सिमेवर जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यामध्ये अमृतसर येथे 77 सभासद सहभागी झाले होते. यामध्ये ५४ महिला आणि मुली आणि 20 पुरुष, 3 लहान मुलांचा सहभाग होता.

बेळगाव,सोलापूर, चिपळूण, पुणे, पिंपरी-चिंंचवड, मावळ येथील संस्कार प्रतिष्ठानच्या महिला व बचत गटांनी सहभाग घेतला. आटारी सिमेचे प्रमुख पी. एस. भट्टी यांनी संस्कार प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे तोंड भरुन कौतुक केले. सर्वांना चांगली रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्यक्ष सिमारेषेजवळ प्रथमच रक्षाबंधन साजरा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रतिष्ठानच्या इतर उपक्रमाची माहिती घेऊन सहकार्यांना सांगितले.

  • याचे संयोजन डॉ. मोहन गायकवाड, मनोहर कड, आनंद पुजारी, चैत्राली नामदे, अभिषेक आदवडे, वैशाली खुडे ,प्रतिभा पुजारी, रुपाली कड, सायली सुर्वे, अभिजित लोंढे, सुनिता गायकवाड, जसमितसिंग वालिया, मिलन गायकवाड यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.