Chinchwad: डिजिटल पेमेंटबाबत बुधवारी कार्यशाळा

एमपीसी न्यूज – केंद्र सरकार तर्फे सर्व शासकीय कार्यालयातील अधिका-यांना डिजिटल पेमंटबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उद्या (बुधवारी) चिंचवड येथे कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत महापालिकेतील अधिकारी देखील सहभागी होणार असून त्यासाठी येणारा एक लाख 25 हजार रुपये खर्च थेट पध्दतीने करण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मंजुरी दिली.

केंद्र सरकारतर्फे ऑनलाईन व्यवहार करण्याचे आवाहन केले जात आहे. ऑनलाईन करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी केंद्र सरकार तर्फे जनजागृती केली जात आहे. डिजिटल पेमंटचे महत्व, त्याचे फायदे सांगितले जात आहेत. त्याअंतर्गत उद्या चिंचवड येथील अॅटो क्लस्टर सभागृहात कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्याशाळेत शासनाच्या सर्व विभागातील अधिकारी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी सहभागी होणार आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेच्या ठिकाणी स्टेज, सजावट यासह अनुषंगिक कामे महापालिकेतर्फे करण्यात येणार आहेत.  मंडप विषयक कामासाठी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाकडे निविदा उपलब्ध नाही. त्यामुळे हे काम थेट पध्दतीने केले जाणार आहे. यासाठी एक लाख 25 हजार रुपये खर्च येणार असून हे काम कोकरे मंडप काॅन्ट्रॅक्टर यांना 11.19 टक्के कमी दराने थेट पद्धतीने देण्यात आले आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायीच्या सभेत आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.