Chinchwad : सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांनी केली दिवाळी साजरी

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई दरम्यान धावणा-या सिंहगड एक्सप्रेस (11010) मध्ये प्रवाशांनी (Chinchwad) शुक्रवारी (दि. 10) दिवाळी साजरी केली. पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाकडून प्रवाशांना फराळाचे वाटप करण्यात आले.

सिंहगड एक्सप्रेस ही पुण्याहून मुंबईला जाणारी पहिली रेल्वे असते. कामानिमित्त पुण्याहून मुंबईला जाणारे चाकरमानी या गाडीने दररोज पुणे-मुंबई अप डाऊन करतात. हे प्रवासी दररोज काही तासांचा वेळ एकमेकांसोबत घालवतात. हे बंध (Chinchwad) जपण्यासाठी प्रवासी दसरा, संक्रांत, दिवाळी असे विविध सण उत्सव साजरे करत असतात.

Chinchwad : शहराची जीवनवाहिनी मृत्यूशय्येवर

सिंहगड एक्सप्रेसच्या नियमित प्रवाशांनी शुक्रवारी रेल्वेत दिवाळी साजरी केली. एकमेकांना फराळाची पाकिटे देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आपसातील स्नेह वृद्धिंगत व्हावा यासाठी प्रवाशांनी हा उपक्रम राबवला.

वर्षाचा सण असलेल्या दिवाळीला देखील कामावर जावे लागत असले तरी चाकरमान्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.