BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत रहावे – डॉ. दीपक शहा

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत रहावे, असे आवाहन कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी केले.

चिंचवड येथील कमला शिक्षण संस्था संचलित प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विषय शिकविणारे प्रा. ब्रिजेश शंकरराव देशमुख यांना इंग्रजी विषयातील पीएच.डी. पदवी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच प्रदान करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांचा कौतुक सोहळा प्रतिभा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.

  • यावेळी व्यासपीठावर प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या जयश्री मुळे, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वनिता कुर्‍हाडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. दीपक शहा पुढे म्हणाले, डॉ. ब्रिजेश देशमुख यांनी लेखक चेतन भगत यांची कादंबरी आणि चित्रीकरण या विषयावर प्रबंध सादरीकरण संशोधन करून केले. ही कौतुकास्पदबाब आहे. आजही ग्रामीण व शहरी भागातही अनेक विद्यार्थी इंग्रजी विषयाचे नाहक भिती बाळगतात. महाविद्यालयात विशेष करून आपल्या महाविद्यालयात इयत्ता दहावीनंतर मराठी माध्यमातून आलेले विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शैक्षणिक शाखा निवडतात.

  • अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्रजी भाषेबद्दल असलेली भिती प्राध्यापकांनी दूर करून त्यांच्या शंकांचे निरसण वेळोवेळी करून त्यांना आदर्श विद्यार्थी बनवावा, असे आवाहन केले. इंग्रजी ही जागतिक भाषा असून आजच्या स्पर्धेच्या युगात ती प्रत्येकाला अवगत असणे काळाची गरज आहे.

कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन उपप्राचार्या वनिता कुर्‍हाडे यांनी केले. तर, आभार प्रा. सुनिता पटनाईक यांनी मानले.

HB_POST_END_FTR-A1
.