Chinchwad : ‘शिखर फाऊंडेशन’च्या पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरामध्ये (Chinchwad) ट्रेकिंग क्षेत्रात अनेक वर्षापासून कार्यरत असलेली आणि त्याच बरोबर सामाजिक उपक्रमामध्ये हिरिरिने सहभाग घेणारी संस्था म्हणून ‘शिखर फाऊंडेशन’ची ओळख आहे. संस्थेने आज पर्यंत सह्याद्री सह हिमालयामध्ये सुद्धा अनेक मोहिमांचे अयोजन केले आहे. ट्रेकिंगच्या क्षेत्रामध्ये नव्यानेच येऊ इच्छिणाऱ्यासाठी किंवा नव्यानेच सुरुवात करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणीसह लहान मुलांसाठी संस्था दरवर्षी नाताळच्या सुट्टीमध्ये ‘बेसिक अड्व्हेंचर कोर्स’चे गेल्या 13 वर्षापासून यशस्वी आयोजन करत आहे.

ट्रेकिंग मोहिमांच्या माध्यमातून संस्थेचे सभासद सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात आणि हिमालयाच्या हिमशिखरावर वर्षभर भटकंती करत असतात. या भटकंती मधून मिळलेले समृद्ध अनुभव ट्रेकिंगची किंवा भटकंतीची आवड असलेल्या समाजातील वाचक वर्गापर्यंत पोहचवण्यासाठी, तसेच सुरुवात करू इच्छिणाऱ्या लेखकांसाठी व्यासपीठ मिळावे हा सामाजिक उद्देश ठेऊन ‘शिखर फाऊंडेशन’ च्या पहिल्या दिवाळी अंकाचे तसेच ई-दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

प्रकाशन सोहळा दिनांक 10 नोव्हेंबर रोजी चिंचवड येथील ‘आनंदीबाई डोके’ सभागृहात आगदी दिमाखात, आनंदात आणि उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून ’नरवीर तानाजी मालुसरे’ यांच्या थेट 12 व्या वंशज, लेखक, कवीयत्री व कोकणकन्या या विशेषणाने प्रसिद्ध असलेल्या ‘डॉ. शितलताई मालुसरे’ उपस्थित होत्या.

त्याच बरोबर चिंचवड येथील नगरसेवक तथा उत्कृष्ट गिर्यारोहक राजेंद्र गावडे, नगरसेवक सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे, महापौर अपर्णा डोके, नगरसेविका आश्विनी चिंचवडे, टाटा मोटर्स आय आर विभागाचे प्रमुख संतोष बडे, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे कार प्लांट युनिट अध्यक्ष अजित पायगुडे, शिवछत्रपतींचे स्वामिनिष्ठ सरदार झुंजारराव मरळ यांचे वंशज  निलेश मरळ आणि चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मोरया गोसावी राज पार्क गृह निर्माण संस्थेचे अध्यक्ष नितीन डांगे पाटील तसेच शिखर फाऊंडेशनचे अध्यक्ष विवेकानंद तापकीर, उपाध्यक्ष जालिंदर वाघोले, खजीनदार प्रवीण पवार, विक्रांत शिंदे, सागर मते आणि सर्व सन्मानीय सभासद उपस्थित होते.

विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अंक प्रकाशन प्रसंगी अध्यक्ष विवेकानंद तापकीर यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून संस्थेचा ट्रेकिंग आणि सामाजिक क्षेत्रातला लेखा-जोखा मांडला. निलेश मरळ यांनी संस्थे बरोबर केलेल्या ट्रेकसचे गोड अनुभव कथन केले.

Alandi : संमेलनाच्या माध्यमातून संत चोखोबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचतील – हभप माणिकबुवा मोरे महाराज

इतर मान्यवराणांनी सुद्धा संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत भावी कार्यासाठी शुभेच्छा देत, भविष्यात भक्कमपणे (Chinchwad)  पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षयी भाषणात डॉ. शितल ताई मालुसरे म्हणल्या “कोकण साहित्य परिषदेचा दिवाळी अंक मी प्रकाशीत करते. त्यामुळे अंक प्रकाशीत करण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात, याची मला जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीचा व्याप सांभाळून, ट्रेकिंग इव्हेंट च्या आयोजनाची जवाबदारी पेलून, दिवाळी अंकासाठी लेखन करून, दिवाळी अंक प्रकाशीत केलात आणि असे करणारी ही एकमेव संस्था असावी.

त्यामुळे मी तुमचे मनापासून कौतुक करते” अंक पहिला असला तरी दर्जेदार आहे अशी पावतीही त्यांनी दिली. अंकाची मांडणी, मुखपृष्ट, छपाई ही लक्षवेधी असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी लेखकांचेही त्यांनी लिहिलेल्या दर्जेदार लेखानाबद्दल कौतुक केले.

सदर दिवाळी अंकांचे संपादकीय शिखर फाऊंडेशन संस्थेचे गिर्यारोहक श्री. शिवाजी आंधळे यांनी केले असून, संस्थेचे अध्यक्ष विवेक तापकीर आणि प्रवीण पवार यांनी अंकामध्ये त्यांचे मनोगत लिहिले आहे. या अंका मध्ये ट्रेकिंग च्या अनुभवावरचे अकरा लेख, दोन कथा, सायकलिंग मोहिमेचे दोन लेख, आरोग्या वरील एक लेख, तीन कविता, वर्षभरातील मोहिमांची चित्रमय झलक आणि गिर्यारोहकांच्या प्रतिक्रिया यांनी अंक परिपूर्ण झाला आहे

. विशेष म्हणजे ट्रेकिंग करताना काय काळजी घ्यावी, त्यासाठी कोणत्या वस्तू वा साधने वापरावीत, त्यांची नावे काय. त्याचा वापर कसा करावा, डोंगरातील शिष्टाचार कोणते? अर्थात ट्रेकिंगच्या सुरक्षे संदर्भात ‘सहज – सुंदर गिर्यारोहण’ या शीर्षकाखाली शिवाजी आंधळे यांनी लिहिलेला लेख नवीन ट्रेकर्स साठी अतिशय मार्गदर्शक ठरवा असाच आहे. एकंदरीत अंक पहिला असला तरी, लेखकांनी त्यांच्या लेखणीतून अंक दर्जेदार बनवला आहे. अंकाचे डिझाईन श्री. रत्नेश चोरगे यांनी केले आहे. मुद्रीशोधन अपर्णा देगावकर तर छापाई विशाल शिंदे यांनी केली आहे.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी आंधळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय रवी मोरे यांनी करुन दिला. आभार प्रदर्शन प्रवीण पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजित भोसले, विक्रांत शिंदे, वैभव देवकर, जालिंदर वाघोले, राजेश चिंचवडे, सनी धारक, तानाजी दौंडकर, प्रियंका बोरकर, सुरभी पवार, तनुष्का गायकवाड आणि शिखरच्या इतर सर्वच स्वयसेवकांनी कष्ट घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.