Wakad : प्रेयसीने केला प्रियकरावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – प्रेयसीने प्रियकरावर (Wakad) कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 13) दुपारी तीन वाजताच्या सुमारास वाकड मधील अटलांटा सोसायटी जवळील आर्या चायनीज सेंटर येथे घडली.

संजय नारायण जाधव (वय 45, रा. श्रीधरनगर, चिंचवड) असे जखमी प्रियकराचे नाव आहे. त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे. पोलिसांनी त्यांच्या प्रेयसीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad : ‘शिखर फाऊंडेशन’च्या पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव आणि त्यांची प्रेयसी हे दोघेही आर्या चायनीज सेंटर येथे राहण्यास आहेत. यातील प्रेयसी हिने फिर्यादी जाधव यांना हॉटेल मधून राहत्या घरी जाण्यास सांगितले. मात्र जाधव यांनी हॉटेलमधून जाण्यास नकार दिला. याचा राग प्रेयसीला आला. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली.

त्यानंतर आरोपी प्रेयसीने चिडून जाऊन कोयत्याने जाधव यांच्या डोक्‍यात, डाव्या हातावर, छातीवर वार करून गंभीर जखमी (Wakad) केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.