Chinchwad station: चिंचवड रेल्वेस्थानकावर महात्मा गांधी यांचा फलक लावावा, चिंचवड प्रवासी संघाची मागणी

एमपीसी न्यूज : महात्मा गांधी हे बरोबर 9 ऑगस्ट 1942 रोजी म्हणजे 80 वर्षापूर्वी चिंचवड रेल्वे स्थानकावर आले होते. (Chinchwad station) याच क्षणाची आठवण म्हणून रेल्वे प्रशासनाने चिंचवड रेल्वे स्थानकावर महात्मा गांधींचा फलक लावावा अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाने चिंचवडचे स्टेशन मास्तर एन. जी. नायर यांना निवेदनाद्वारे मंगळवारी (दि.9) दिली.

यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार व पत्रकार विजय जगताप यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डीआरएम रेणू शर्मा यांना ईमेलद्वारे चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, संगीता जाधव, सुरज आसदकर, मनोहर जेठवाणी, मुकेश चुडासमा, निर्मला माने, हार्दिक जानी, नयन तन्ना, माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वतीने मागणी करण्यात आली.

Veer Dam : निरा नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा

निवेदनात म्हटले आहे की, 8ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे महात्मा गांधी यांनी चले जाव हा चळवळीचा इशारा ब्रिटिशांना दिला. यावेळी वातावरण स्थिर होईपर्यंत गांधीजींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्याचा निर्णय इंग्रज पोलिस अधिकार्‍यांनी घेतला. 8 ऑगस्टच्या रात्री साडेआठ वाजता मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या एका पॅसेंजर गाडीत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत गांधीजींना बसवण्यात आले.(Chinchwad Station) गांधीजींना अटक केली असून पुण्यात आणले जाणार… ही बातमी वार्‍याच्या वेगाने सर्वत्र पसरली. मग स्वातंत्र्यप्राप्तीसाठी पेटून उठलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी पुणे स्टेशनवर इंग्रजांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी व निषेध करण्याची तयारी सुरू केली. पुण्यात गर्दी होऊन गडबड होऊ शकते, याची चाहूल इंग्रज पोलिस अधिकार्‍यांना लागली, मग आपल्या प्लॅनमध्ये बदल करत पहाटे 5 वाजून 13 मिनिटांनी पॅसेंजर गाडी चिंचवड रेल्वे स्थानकावर येताच गांधीजींना तिथे उतरवण्यात आले. अनपेक्षितपणे गांधीजी चिंचवडला उतरलेले पाहून मोजक्या कार्यकर्त्यांना त्यांचे दर्शन झाले.

 

चिंचवड रेल्वे स्थानक ते पुणे मुंबई महामार्ग या तीन मिनिटांचे अंतरामध्ये खाण परिसर असल्याने मोठमोठे दगड होते व बैलगाडी जाईल इतकीच कच्ची वाट होती. चालत चालत गांधीजींना महामार्गावर आणल्यानंतर तिथून एका मोटारीत बसून पुण्याकडे नेण्यात आले. या प्रसंगाची आठवण म्हणून रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवरील दुतर्फा बाजूला प्रवासी यांना माहितीसाठी फलक लावण्यात यावेत.(Chinchwad Station) मागील काही वर्षापर्यंत हा बोर्ड येथे होता. नंतर रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करताना हा बोर्ड रेल्वे प्रशासनाच्या वतीने काढून टाकण्यात आला. तो पुन्हा लावण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.