Ghazal Event: पिंपरी-चिंचवडकरांची रविवारची संध्याकाळ गझलेने मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज :  पिंपरी-चिंचवडकरांची रविवारची संध्याकाळ खरी निरागस तुझ्यासारखी दुनिया असती तर भल्या माणसा मनासारखी दुनिया असती तर अशा एकापेक्षा एक सरस गझलांनी मंत्रमुग्ध झाली. (Ghazal Event) गझलपुष्प पिंपरी-चिंचवड आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एम्पायर स्क्वेअर, येथे रविवारी (दि.7) आयोजन करण्यात आले होते.

या मुशाय-यात गझलकार रघुनाथ पाटील, प्रशांत पोरे, राज आहेरराव,  संदिप जाधव, समृद्धी सुर्वे,  प्रदिप तळेकर हे गझलकार सहभागी झाले होते.

Chinchwad station: चिंचवड रेल्वेस्थानकावर महात्मा गांधी यांचा फलक लावावा, चिंचवड प्रवासी संघाची मागणी

या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सदानंद बोगम यांचा गझलपुष्पच्या वतीने नंदकुमार मुरडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मुशाय-यात बाहेर पडणा-या पावसासोबत बहारदार गझलांची जणू बरसातच झाली.रसिकांचा उदंड प्रतिसाद कार्यक्रमाला लाभला.( Ghazal event) या प्रसंगी ज्येष्ठ कथालेखक बशीर मुजावर, कवयित्री वर्षा बालगोपाल,नेहा चौधरी, मुकेश चौधरी ,माधव पाटील, सरोज चौधरी,सारिका माकोडे, हेमंत जोशी, नितीन हिरवे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकम संयोजनात  अभिजित काळे, निलेश शेंबेकर, आदेश कोळेकर आणि  एम्पायर स्क्वेअर जेष्ठ नागरिक संघांनी सहकार्य केले. तर सूत्रसंचालन दिनेश भोसले यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.