BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : टाटा मोटर्स कामगार स्वयंसेवकांच्या सहभागातून शाहूनगर येथील खाणीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन

एमपीसी न्यूज- चिंचवड शाहूनगर येथील खाणीमध्ये गुरुवारी (दि. 12) गणेश भक्तांनी उत्साहवर्धक वातावरणात गणेश मूर्तीचे विसर्जन केले. यामध्ये टाटा मोटर्स कंपनीचे स्वयंसेवक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

दुपारी चार वाजल्यापासून विसर्जनाला सुरूवात झाली. रात्री 11 वाजेपर्यंत सर्व मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. यामध्ये श्रीकांत कदम, किरण कांबळे, राजाराम सावंत, लक्ष्मणराव इंगवले या टाटा मोटर्स कंपनीच्या स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका अनुराधा गोरखे उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भक्तांना बोट, मंडप, पाण्याची सोय या सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.

टाटा मोटर्स कंपनीच्या स्वयंसेवकांनी सर्व निर्माल्य कुंड्यामध्ये जमा करून घेतले. शाडूच्या मूर्ती पाण्यात विरघळतात. त्यामुळे यावर्षी शाडूच्या मूर्तीचे प्रमाण अधिक आढळून आले. टाटा मोटर्स स्वयंसेवकांनी परिसर स्वच्छतेवर भर दिला. पाणी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली. या कार्यक्रमासाठी श्रीकांत कदम, किरण कांबळे यांनी विशेष पुढाकार घेतला.

HB_POST_END_FTR-A2

.