Chinchwad : बनावट डेबिट कार्ड वापरून तीन खात्यातून काढले सव्वाचार लाख रुपये;  अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बँक ऑफ इंडियाचे नकली/बनावट डेबिट कार्ड तयार करून अज्ञाताने तिघांच्या बँक खात्यावरून 4 लाख 20 हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार 29 सप्टेंबर 2018 ते 1 जुलै 2019 या कालावधीत चिंचवड आणि नवी दिल्ली येथे घडला.

याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडिया चिंचवड शाखेचे मुख्य व्यवस्थापक प्रमोद नामदेवराव ढेंगरे (वय 53, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दिलीप मारुती डोळ, अश्विन अमोलक दुगड आणि सुभाष ज्ञानोबा पडवळ यांच्या खाते क्रमांकाचे नकली डेबिट कार्ड तयार केले. त्याद्वारे दिलीप डोळ आणि अश्विन दुगड यांच्या खात्यावरून प्रत्येकी 1 लाख 60 रुपयांचा व्यवहार केला.

तसेच सुभाष पडवळ यांच्या खात्यावरून 1 लाखांचा असा एकूण 4 लाख 20 हजार रुपयांचा व्यवहार केला. हा प्रकार लक्षात येताच मुख्य व्यवस्थापक ढेंगरे यांनी गुन्हा नोंदवला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.