Chinchwad : बंद घरातून चोरटयांनी लांबविले अडीच लाखांचे दागिने; मोलकरणीवर संशय

Two and a half lakh jewelery stolen from a locked house; Suspicion on the maid

एमपीसी न्यूज – घरातील सर्व सदस्य लग्नानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरात ठेवलेले 2 लाख 55 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना 11 मार्च ते 16 मार्च 2020 या कालावधीत दर्शननगरी सोसायटी, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी तब्बल तीन महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घर मालकिणीचा संशय घरकाम करणा-या मोलकरणीवर आहे.

याप्रकरणी चैत्राली प्रदीप पायगुडे (वय 35, रा. दर्शननगरी सोसायटी, चिंचवड) यांनी  चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता फिर्यादी चैत्राली पायगुडे लग्नानिमित्त शिवाजीनगर पुणे येथे गेल्या होत्या. लग्न झाल्यानंतर त्या घरी आल्या. काही दिवसानंतर त्यांनी घरातील लाकडी कपाटात बघितले असता त्यातील दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

कपाटात ठेवलेले साडेसहा तोळ्यांचे मंगळसूत्र, दोन तोळ्याची कर्णफुले असे एकूण 2 लाख 55 हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते.

फिर्यादी चैत्राली यांना त्यांच्या घरी काम करणा-या मोलकरणीवर संशय असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.