Chinchwad : वाल्हेकरवाडी मध्ये दोन दुकानांना आग; दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – वाल्हेकर वाडी चिंचवड येथील जय मल्हार कॉलनी मध्ये असलेल्या (Chinchwad) दोन दुकानांना सोमवारी (दि. 22) पहाटे आग लागली. या आगीमध्ये दोन दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. दुकानात झोपलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह सापडले आहेत.

ललित अर्जुन चौधरी (वय 21), कमलेश अर्जुन चौधरी (वय 23) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवासी रामेश्वरी लावंड यांनी सोमवारी पहाटे रात्री अडीच वाजताच्या सुमारास मुख्य अग्निशमन केंद्र, पिंपरी येथे फोन करून कळविले की, जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड या ठिकाणी पत्र्याच्या शेडला आग लागली आहे. माहिती मिळताच प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र येथील एक, मुख्य अग्निशमन केंद्र येथील दोन व चिखली उप अग्निशमन केंद्र व थेरगाव उप अग्निशमन केंद्र येथील एक अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले.

Alandi : श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आळंदीमध्ये उत्साही वातावरण

पत्र्याच्या शेडच्या रांगेमधील दोन शेडला आग लागली होती. दोन्ही गोडाऊन पूर्णपणे पेटलेले होते. प्रथमदर्शी पाहणी केली असता माहिती मिळाली की, पहिले गोडाऊन मध्ये लाकडाची वखार आणि हँड सो मशीन्सला, एअर कॉम्प्रेसर, अन्य ज्वलनशील साहित्य व उपकरणे तसेच स्विफ्ट गाडी (एमएच 14/डीएक्स 9701) यांनी पेट घेतले होते. दुसऱ्या गोडाऊन मध्ये अल्युमिनियमच्या फ्रेम व दोन टू व्हीलर तसेच दोन व्यक्ती आगीच्या धुरामुळे (कार्बन डाय-ऑक्साइड तथा कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूमुळे) झोपेतच असताना त्या शेडमध्ये ऑक्सीजन वायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे बेशुद्ध होऊन पोटमाळ्यावर पडून राहिल्याने आगीच्या भक्षस्थानी पडल्याने मृत्युमुखी झाले असल्याचे आढळून आले.

जवानांनी पाणी मारून आग पूर्णपणे विझविली. परिसरातील लगतच्या अन्य निवासी इमारतीमधील सर्व नागरीकांना पोलिसांच्या मदतीने इमारती बाहेर सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले.

स्थानिक रहिवाशांनी दीलेल्या माहितीनुसार, गणेश पॅकेजिंग इंडस्ट्रीज मधील वखारीला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. विनायक ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर हे त्याला लागून असल्यामुळे ही आग व धूर ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर शेड मध्ये गेला. त्या शेडला एकच दरवाजा असल्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड व कार्बन डाय-ऑक्साइडचा धूर झाला. तसेच त्या शेडमध्ये पोटमाळ्यावर अडकलेले दोन व्यक्ती धुरामुळे बेशुद्ध पडले आणि आगीच्या भक्षस्थानी सापडले. अग्निशमन पथके घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी सदरील शेडचे दरवाजे खोलून ठेवले होते, व बादलीच्या साह्याने पाणी मारून अग्निशमन कार्य करत होते.

गोडाऊन चालवणारे भाडेकरू श्रीराम भवरलाल सुतार यांच्या माहितीनुसार, ललित अर्जुन चौधरी (वय 21), कमलेश अर्जुन चौधरी (वय 23) हे शेड मध्ये झोपले होते. आगीचे नेमके कारण समजू शकले (Chinchwad) नाही.

 

 

https://www.youtube.com/watch?v=FxHSp4GYwzQ&pp=ygUIbXBjIG5ld3M%3D

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.