Pune : पुणे शहर पोलीस दलातील उपनिरीक्षकावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – आरोपीला गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी आरोपीच्या ( Pune)  भावाकडून वकिलामार्फत 40 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि वकिलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात मदत करण्यासाठी सुरुवातीला पाच लाखांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तडजोडीअंती 40 हजार स्वीकारताना सोमवारी (दि. 22) वकिलास रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक गणेश वसंत चव्हाण (वय 35, नेमणूक  – अलंकार पोलीस स्टेशन ,पुणे शहर), वकील राहुल जयसिंग फुलसुंदर (वय 31, रा. कोथरुड ,पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 34 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली आहे.

Chinchwad : वाल्हेकरवाडी मध्ये दोन दुकानांना आग; दोघांचा मृत्यू

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाच्या विरुद्ध अलंकार पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. लोकसेवक गणेश चव्हाण यांनी त्या गुन्ह्यात तक्रारदार यांच्या भावाला अटक न करण्यासाठी व गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदार यांना पाच लाख रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी एसीबीकडे दिली होती.

या तक्रारीची पडताळणी केली असता पोलीस लोकसेवक गणेश चव्हाण याच्यासाठी खाजगी इसम राहुल फुलसुंदर यांनी तडजोडी अंती 40 हजार रुपयांची लाच पंचासमक्ष मागणी करून ही लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. त्यावेळी एसीबी ने फुलसुंदर याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( Pune) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.