Vadgaon Maval : मराठा बांधवांना प्रशासनाने सहकार्य करावे; बापूसाहेब भेगडे यांची तहसीलदारांकडे मागणी

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून ( Vadgaon Maval ) आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे रवाना होत आहेत. हे आंदोलन मावळ तालुक्यातून पुढे जाणार आहेत. मावळ तालुक्यात असताना त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. तसेच मावळ तालुक्यामध्ये आढळलेल्या कुणबी नोंदीची यादी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये लावण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी केली आहे.

हे निवेदन देताना संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे, वडगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रविण ढोरे, मावळ तालुका रा.युवक काँग्रेस मा.अध्यक्ष कैलास गायकवाड, शैलेश वहिले,मा.ग्रा.पं. सदस्य सोमनाथ धोंगडे, नितीन जांभळे,वडगावशहर युवक अध्यक्ष अतुल ढोरे, भूषण ढोरे,मुन्ना ढोरे, अनेक मान्यवर उपस्थित होते.

Pune : पुणे शहर पोलीस दलातील उपनिरीक्षकावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल

निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातुन आंदोलन करण्यासाठी लाखो मराठा मुंबईला पायी जात आहेत.मराठा आंदोलकांचा जाण्याचा मार्ग मावळ तालुक्यामधुन जात असल्याने त्यांना आपल्या प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य व्हावे तसेच सर्वांना स्वच्छ पिण्याचे पाणी,आरोग्य व्यवस्था,लाईट व्यवस्था,टॅायलेटची व्यवस्था, इतर सर्व व्यवस्था मिळावी आणी आमच्या मराठा बांधवाना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या सर्व गोष्टीची काळजी घ्यावी.

तसेच मावळ तालुक्यात एकुण 13500/- कुणबी दाखले सापडले आहेत तर त्याची यादी प्रत्येक ग्रामपंचायतमधे लावावी जेणे करून आमच्या मावळच्या जनतेला वडगांव तहसील ॲाफिस मधे येण्याजाण्याचा नाहक त्रास होणार नाही असेही निवेदनात म्हटले ( Vadgaon Maval ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.