Chinchwad : अर्बन स्ट्रीट रस्त्याच्या विद्युत कामांसाठी सव्वाकोटीचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जगताप डेअरी ते मुळा नदीवरील पुलापर्यंतचा 24 मीटर रूंद रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्याच्या कामाअंतर्गत विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सव्वाकोटी रूपये खर्च होणार आहे.

विशालनगर – जगताप डेअरी ते मुळा नदीवरील पुलापर्यंतचा 24 मीटर रूंद रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्याचे काम सुरू आहे. या कामाअंतर्गत विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी इच्छूक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. निविदा दर 1 कोटी 57 लाख रूपये अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या.

त्यापैकी यश इलेक्ट्रोलाईन यांनी निविदा दरापेक्षा 22 टक्के कमी म्हणजेच 1 कोटी 22 लाख 55 हजार रूपये दर सादर केला. ही निविदा कमी दराची असल्याने स्वीकृत करण्याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी 16 डिसेंबर 2019 रोजी मान्यता दिली. त्यानुसार, यश इलेक्ट्रोलाईन यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.