Chinchwad : वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांसासाठी मोफत वैद्यकीय औषधे व अँम्ब्युलन्स रवाना

एमपीसी न्यूज : चैत्री एकादशी‌ यात्रे निमित्ताने पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारकरी भक्तांच्या सेवेसाठी वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट तर्फे  मोफत वैद्यकीय औषधे व उपचारासाठी (Chinchwad) आज सकाळी चिंचवड येथून अँम्ब्युलन्स  पाठविण्यात आली. वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट तर्फे 24 तास मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येते.

पिंपरी चिंचवड औषधे विक्री (दवा बाजार) चे अध्यक्ष  संतोष खिवसरा व संस्कार सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष बालकृष्ण खंडागळे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संजय खानोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते राजु कांबळे व पुणे विभाग प्रमुख मुकेश सोमैय्या यांनी वैद्यकीय सेवा देणारी अँम्ब्युलन्स  रवाना केली.

Nigdi : प्राधिकरण सेक्टर 25 येथे संत जलाराम चौकाचे‌ व LED पथदिव्यांचे उद्घाटन संपन्न

त्या वेळेस विश्वस्त श्रीराम नलावडे, डॉ वसंतराव गोरडे, डॉ निलिमा बांगी, प्रदीप तासगांवकर संतोष नलावडे, प्रकाश सातव, डॉ प्रमोद इंगळे, अरुण महाजन, सिताराम आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. यात्रा काळात 2ते 3 लाख लोक पंढरपूरला येतात. त्या दुष्टीने दरवर्षी वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्टच्या वतीने ही सेवा पुरविण्यात येते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.