Nigdi : प्राधिकरण सेक्टर 25 येथे संत जलाराम चौकाचे‌ व LED पथदिव्यांचे उद्घाटन संपन्न

एमपीसी न्यूज : निगडी येथे प्राधिकरण सेक्टर 25 येथील (Nigdi) नुतनीकरण करण्यात आलेल्या संत जलाराम चौकाचे‌ व नवीन बसवलेल्या LED पथदिव्यांचे उद्घाटन पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे व  उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते सोमवारी (3 एप्रिल) संध्याकाळी करण्यात आले.

या वेळेस या नगरसेविका शर्मीला बाबर,  उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक अमित गावडे, रोहिणी सोमैय्या, युवा नेते अनुप मोरे, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे, माजी महापौर आर एस कुमार, मनोहर कुलकर्णी, प्रदीप तासगांवकर, वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त श्रीराम नलावडे, जगराम चौधरी, चंद्रकांत बोडके, योगेश कौशिक, ज्येष्ठ नागरिक संघाचे लालचंद मुथीयान,  उंद्रे, नितीन यादव, नंदकुमार पंचपोर, पुष्पक जैन, लक्ष्मी मित्तल उपस्थित होते.

Charholi News : राष्ट्रवादीने भरविलेल्या बैलगाडी शर्यतीमधील वाद भाजप आमदाराने मिटविला!

वास्तुविशारद शेखर कोकणे यांचा आ. अण्णा बनसोडे व उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन प्राधिकरण व्यापारी असोसिएशनचे (Nigdi) अध्यक्ष मुकेश सोमैय्या यांनी केले.  उपाध्यक्ष हेमंत मिश्रा यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.