Chinchwad : वज्रमुठीला अगोदरच तडे गेले आहेत – फडणवीस

एमपीसी न्यूज : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Chinchwad ) पक्षाला विजय मिळाल्यानंतर राज्यातील अनेक भागात महाविकास आघाडीमार्फत वज्रमूठ सभेची तयारी करण्यात येत आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांच्या वज्रमुठीला अगोदरच तडे गेलेले आहेत.

कोणी कुठे बसायचे, कोणी कुठे उभारायचे. कोणी पाहिले बोलायचे? या संदर्भातील वाद सुरू आहेत. वज्रमुठीच्या नेत्यांच्या प्रयोगबद्दल पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. त्यामुळे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नसल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांना फडणवीस यांनी सुनावले.

Chinchwad : आमदार महेश लांडगे यांचा ‘तो’अधिकार आहे – उपमुख्यमंत्री

मी त्यावर काही बोलू शकत नाही –

16 आमदार अपात्र होऊ शकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले की हे प्रकरण (Chinchwad) विधानसभा अध्यक्षांकडे असून मी त्यावर काही बोलू शकत नाही.

त्यावर त्यांच्याकडे सुनावणी होणार आहे. जो काही निर्णय द्यायचा असेल ते कायदेशीरपणे घेतील. मात्र एक अभ्यासक, एक वकील म्हणून 25 वर्ष विधानसभेत त्यांनी काम केले आहे. त्यामुळे एकच सांगतो की, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला एक समजले आहे. पोपट मेला असून तो मान हलवत नाही. तो हात पाय हलवत नाही. अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.