Chinchwad : चिंचवड, वाकडमधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – चिंचवड आणि वाकड परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 19) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत बालिका मोहन जाधव (वय 32, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांनी त्यांची 16 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / एचपी 1887) राहत्या घरासमोर 17 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

तसेच लक्ष्मण संभा वाघमारे (वय 45, रा. थेरगाव, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघमारे यांनी त्यांची 18 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 25 / झेड 2890) 17 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता घराजवळ पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 18 मार्च रोजी सकाळी उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.