Kartiki Yatra: आळंदी कार्तिकी यात्रेनिमित्त दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी

एमपीसी न्यूज : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त लाखो भाविक आळंदी मध्ये दाखल झाले आहेत.

कार्तिकी एकादशीच्या (उपवासा) नंतर दि.21 कार्तिकी कृ. द्वादशी निमित्ताने आळंदी शहरात सकाळी ठिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जेवणाच्या पंगतीचे आयोजन दिंड्यातर्फे करण्यात आले होते.तसेच शहरात कार्तिकी यात्रे निमित्त ग्रंथ साहित्य, तुळशीमाळा,ज्वेलरी,प्रसाद,लाकडी घरगुती उपयोगी वस्तू,शेती उपयोगी वस्तू, घोंगडी चादर,लहान मुलांची खेळणी, खाद्यपदार्थाची इतर अश्या विविध प्रकारची मोठ्या प्रमाणात दुकाने आलेली आहेत.तिथे खरेदी साठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे.

Rajgurunagar News: स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईत 2 आरोपींना मोठ्या शस्त्रसाठयासह केले जेरबंद

नदी पलीकडील दर्शनबारी माऊलींच्या दर्शना करीता सकाळी 10 वा.पूर्ण भरलेली होती.रविवारी भामा आसखेड येथील जल केंद्रावर तांत्रिक समस्या उदभवली होती. त्यामुळे दि.21 सोमवार रोजी सकाळी उशिराने आळंदी शहरात पाण्याचे वितरण करण्यात आले.दि.22 नोव्हेंबर रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.