CM Address to State : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेला संबोधित करणार

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी, दि.08) राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतील. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पहिला टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई, ठाण्यासह 25 जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, पुण्यासह 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अहमदनगर आणि बीड अशा 11 जिल्ह्यांत सध्याचे निर्बंध कायम आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या संबोधन याकडे सर्वांचे लक्ष असेल.

तसेच, लोकल बाबत काही निर्णय घेतला जाणार का हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उपाहारगृहांना व उपनगरी रेल्वे प्रवासाला परवानगी देण्याबाबत पुढील आठवड्यात आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.