Pune News : पुणे शहरातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत  सुरू –  अजित पवार

एमपीसी न्यूज –जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सर्व दुकाने सर्व दिवशी सुरु राहतील, अशी माहिती दिली आहे. तसेच  पुण्यात मॉल सोमवारपासून सुरु असतील, पण लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे पुण्यात व्यापा-यांचे मोठे नुकसान होत होते. याबाबत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. व्यापारी, नेते, पदाधिकारी सर्वजण दुकाने सुरू करण्याबाबत मागणी करत होते. त्याची दखल घेत आठवड्याची कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी निर्बंध शिथिल केल्याचे सांगितले.

निर्बंधातून सूट देण्यात आल्याने नागरिक, व्यापारी, दुकानदार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पुण्यातील दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टी नुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहतील. कोरोना लसीचे दोन डोस झालेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल.  मॉल, हॉटेल, जलतरण तलाव यासाठी सुद्धा नवी नियमावली लागू केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुणे ग्रामीण सुद्धा लेवल 3 वर आहे. निर्बंध शिथिल करण्यात येत असले तरी पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के झाल्यास कडक निर्बध लावणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नवी नियमावली, दोन डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश

ते म्हणाले की, मॉल, हॉटेल, जलतरण तलाव यासाठी नवी नियमावली लागू केली जाणार आहे. मॉलबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात मॉल सोमवारपासून सुरु असतील, पण लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.