CM Relief Fund : रयत शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाऊणे तीन कोटींची मदत

एमपीसी न्यूज – रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाऊणे तीन कोटींची मदत देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मदतीचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘कोरोना या जागतिक महामारीने ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार रयत शिक्षण संस्था सातारा, या संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला’.

सर्व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय वेतनाची जमा रक्कम रुपये 2 कोटी 75 लाख 92 हजार 821 इतकी रक्कम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.