Talegaon News : निगडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आंबळे, कदमवाडी, मंगरूळ,शेटेवाडी या गावांना लसीकरणाची सुरूवात

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या निगडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आंबळे, कदमवाडी, मंगरूळ,शेटेवाडी या गावांना लसीकरणाची सुरूवात मंगळवार (दि 27)  रोजी करण्यात आली. या करिता जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागातील अधिकारी डॉ जयेश बिरारी, डाॅ ऐश्वर्या ठोंबरे, देवळापुरकर सिस्टर व आरोग्य सेवक वैभव आखाडे हे लसीकरण करणार आहेत. 

निगडे येथील उपकेंद्राच्या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मावळ तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती, विद्यमान सदस्य शांताराम कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या लसीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच सविता भांगरे, उपसरपंच रामदास चव्हाण व सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीसपाटील संतोष भागवत, सागर यादवसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निगडे येथील उपकेंद्रात लसीकरणाच्या मागणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रकांत लोहारे व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने  माजी उपसभापती शांताराम कदम प्रयत्नशील होते. त्यांच्या विशेष प्रयत्नातून व निगडे ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, डाॅ जयेश बिरारी व त्यांची टीमच्या विशेष सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण मोहिम राबविण्यात आली.

निगडे या केंद्रावर काल 100 नागरिकांना लस देण्यात आली. आठवड्यातून दोन वेळा या केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असून पुढील काळात नवलाख उंब्रे व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आंबी येथेही लसीकरण करण्यात येणार असल्याचे शांताराम कदम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.