Dehu Road Crime News : ड्रॉइंग परिक्षेसाठी घराबाहेर पडलेल्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार

एमपीसी न्यूज – ड्रॉइंग परिक्षेसाठी घराबाहेर पडलेल्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मुलगी घराबाहेर पडताना स्कुल बॅग, हॉल तिकीट आणि आधार कार्ड घेऊन बाहेर पडली. सोमवारी (दि.11) सकाळी 11.10 वा. थॉमस कॉलनी, देहूरोड येथे ही घटना घडली.

याबाबत अपहरण झालेल्या मुलीच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी, फिर्यादी यांची 15 वर्षीय मुलगी ड्रॉइंगच्या परिक्षेसाठी स्कुल बॅग, हॉल तिकीट आणि आधार कार्ड घेऊन घराबाहेर पडली. घरी न आल्याने तिचा शाळेत, आजुबाजुला तसेच नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला. तरीही कुठेच न सापडल्याने तिचे अपहरण केले असल्याचे तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.