Maharashtra School : राज्यातील शाळांचं पूर्ण स्वरूप बदलणार!

एमपीसी न्यूज : राज्यातील शाळांचे पूर्ण स्वरूप बदलण्याबाबातचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील शाळांचे पूर्ण स्वरूपच बदलणार (Maharashtra School) असून केंद्र सरकारची पीएमश्री योजना राज्यात देखील लागू करण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारने सप्टेंबर 2022 मध्ये या योजनेची घोषणा केली होती. या योजनेनंतर्गत देशात 14 हजार 597 शाळा सुरु करण्यात येणार आहे. (Maharashtra School) आदर्श शाळा म्हणून या शाळा ओळखल्या जातील असे सांगितले जात आहे. देशातील 18 लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

Talegaon Dabhade : तर इंग्रज भारतात आलेच नसते, उलट मराठ्यांचे घोडे लंडनपर्यंत गेले असते

आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया’ महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रीमंडळामध्ये खलबते झाली.

काय आहे पीएमश्री योजना?

– या शाळेत नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ आणि आधुनिक पायाभूत सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात येईल.

– शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.

– विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठीही उपायोजना सुचवल्या जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.