Talegaon Dabhade : तर इंग्रज भारतात आलेच नसते, उलट मराठ्यांचे घोडे लंडनपर्यंत गेले असते

एमपीसी न्यूज – शिवरायांना फक्त 49 वर्षाचे आयुष्य लाभले. शिवरायांना आणखी 10 वर्षाचे आयुष्य मिळाले असते तर इंग्रज भारतात आलेच नसते. शिवरायांनी संशोधनाच्या बळावर इंग्रज भारतात येण्यापूर्वीच मराठ्यांची घोडी पॅरिस, लंडन येथे धडक मारली असती, (Talegaon Dabhade) असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेने आयोजित केलेल्या मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेत विश्वास पाटील यांनी पहिले पुष्प गुंफले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेने आयोजित केलेल्या मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेत श्री पाटील पहिले  पुष्प गुंफताना बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, संयोजक समिती अध्यक्ष शैलेश शहा, प्रा. डॉ. संभाजी मलघे,संचालक गणेश खांडगे, विलास काळोखे तसेच  मावळ भूषण कृष्णराव भेगडे, सत्यशीलराजे दाभाडे, वृषालीराजे दाभाडे,पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे,शंकरराव शेलार,प्रा सुभाष जगताप,एम एम ताटे, साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे,नूतन महाराष्ट्र महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार,राजश्रीताई म्हस्के, संस्थेचे विश्वस्त संजय साने,परेश पारेख,संदीप काकडे,युवराज काकडे,संजय वाडेकर,बाळासाहेब काकडे,शामराव दाभाडे, संतोष दाभाडे, रंजनाताई भोसले,बी फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय आरोटे,डी फार्मसीचे प्राचार्य जी.एस शिंदेआदींसह या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक,पालक,अनेक संस्थांचे पदाधिकारी,राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे यांनी इंद्रायणी महाविद्यालयाच्या सर्व शैक्षणिक उपक्रमाची माहिती देत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. कृष्णराव भेगडे साहेबांची विचारांची प्रेरणी आजच्या युवा पिढीला व्हावी, तसेच सहिष्णूता आणि पुरोगामी विचार सरणी यांचा विद्यार्थ्यांना अनुग्रह व्हावा या उद्देशाने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते असे काकडे यांनी सांगितले.

पाटील पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जवळ भवानी तलवारी पेक्षाही मोठी अशी बुद्धीची तलवार असल्याने त्यांनी त्या काळात अनेक युद्ध जिंकून आपला दरारा निर्माण केला होता.

Chinchwad Bye-Election: निवडणूक निरीक्षकांनी केली मतदान केंद्रांची तपासणी

स्वराज्यातील प्रत्येक घटकाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य वाढीसाठी उपयोग केला. सध्या काही विद्वान आणि राजकारणी मंडळी मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज,(Talegaon Dabhade) छत्रपती संभाजी महाराज यांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडतात, हे दुर्दैव आहे. इतिहासातील सत्य समाजापुढे आले पाहिजे. शिवरायांचे भव्य स्मारक राज्य शासन करीत आहे. ते स्मारक जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु मी मात्र सध्या शिवरायांच्या शब्दरूपी भव्य स्मारकाची उभारणी करीत आहे.

यावेळी श्री पाटील म्हणाले की शिवरायांनी अनेक अडचणींवर मात करत स्वराज्याला आकार दिला. आपल्या कुशाग्र बुद्धीच्या तलवारीने उभ्या ठाकलेल्या मोठ्या शत्रुंना त्यांनी नेस्तनाबूत केले. महाराष्ट्र भूमीत जन्माला येणे फार मोठे पुण्याचे काम आहे पाटील असेही म्हणाले.

मराठी वाचक हे जागृत असून लेखकांनी समाजामध्ये जे दिसते ते टिपले पाहिजे. व प्रत्यक्षात उतरवले पाहिजे. तसेच समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीची व स्वभावाची माणसे असून त्यांच्या स्वभावावरून लेखकास लिहिण्यास विषय मिळतात.

छत्रपती शिवराय हे महापुरुष होते. तर शहाजीराजे महाराज हे युगपुरुष होते.जसे आपले नायक मोठे होते त्यापेक्षा त्यांचे दुश्मनही मोठे होते.पण छत्रपती शिवरायांकडे भवानी तलवारी पेक्षाही बुद्धीची तलवार मोठी असल्याने त्यांनी शत्रूच्या डावपेचावर वेळोवेळी मात केली. (Talegaon Dabhade) आपल्या स्वराज्यामध्ये असलेल्या प्रत्येक घटकाचा त्यांनी स्वराज्य वाढीसाठी खुबीने नियोजनबद्ध रीतीने उपयोग केला व सर्वांना स्वराज्य उभारणीच्या कामाला लावले.

सध्या काही विद्वान, राजकारणी हे मतासाठी शिवरायांचा व संभाजी महाराजांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडतात. यासाठी सत्यता ही समाजापुढे आली पाहिजे. अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

शिवरायाचे भव्य स्मारक राज्य शासन करीत असून ते जेव्हा होईल त्यावेळेस होईल.परंतु मीमात्र सध्या शिवरायांच्या शब्दरूपी भव्य स्मारकाची उभारणी करीत असल्याचे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.

शिवरायांची आठवण सांगताना पाटील म्हणाले की, शिवरायांना फक्त आणि फक्त 49 वर्षाचे आयुष्य जगायले मिळाले. परमेश्वर नावाची चीज हयात आहे की,नाही,  (Talegaon Dabhade) अस्तित्वात आहे की, नाही? यदाकदाचित परमेश्वर, विधाता मला जर भेटला तर मी त्याला प्रश्न विचारला असता की, अरे बा !परमेश्वरा तू जर एवढा चांगला होता तर माझ्या शिवरायांना आणखी 10 वर्षाचे आयुष्य दिले असते तर काय झाले असते,जर आणखी दहा वर्षाचे आयुष्य शिवरायांना मिळाले असते तर शिवरायांनी संशोधनाच्या बळावर इंग्रज भारतात येण्यापूर्वीच मराठ्यांची घोडी पॅरिस,लंडन येथे धडक मारली असती

या व्याख्यानमालेस मावळ भूषण कृष्णराव भेगडे स्वतः उपस्थित होते. त्यांच्या उपस्थिती बद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. व जागेवर जाऊन त्यांचा विशेष सन्मान केला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या संचालिका निरुपा कानिटकर यांनी आभार मानले.तर सूत्रसंचालन कवी उद्धव कानडे यांनी केले.

 

विशेष पुरस्काराने सन्मानित

उद्योजक,संस्थेचे विश्वस्त संजय साने, शैलेश शहा,विलास काळोखे, निरूपा कानिटकर, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे खजिनदार राजेश म्हस्के, उद्योजक रणजीत काकडे, सुधीर पाटील, आणि धनंजय काटे आदी मान्यवर प्रायोजकांचा उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच समाज कार्यामध्ये अग्रभागी असलेले श्री आण्णासाहेब दाभाडे यांना सामाजिक कार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन पानिपतकार विश्वास पाटील यांचे हस्ते गौरविण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.