Metro Work Traffic : मेट्रोच्या कामामुळे पुणे विद्यापीठ जंक्शनवर अवजड वाहनांना 24 तासांची बंदी

एमपीसी न्यूज : पुणे शहर वाहतूक पोलिसांनी पुणे विद्यापीठ चौकात (Metro Work Traffic ) सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासाठी आणखी निर्बंध जाहीर केले असून गणेशखिंड रस्त्यावर आणि पाषाण रोड, सेनापती बापट रोड, बाणेर रोड या भागात अत्यावश्यक वाहने वगळता अवजड वाहनांना 24 तासांची बंदी घालण्यात आली आहे.

पुणे वाहतूक पोलिसांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, पुणे मेट्रोच्या पुढील टप्प्याचे काम सुरू असताना, गणेशखिंड रस्ता आणि पुणे विद्यापीठ चौकातील बांधकामासाठी सुमारे 11 मीटर रस्त्याची रुंदी वापरली जात आहे.

पुणे विद्यापीठ जंक्शन, पाषाण, बाणेर, औंध आणि गणेशखिंड रोड आणि सेनापती बापट रोडची एकत्रित वाहतूक पाहता हे शहरातील सर्वात व्यस्त रहदारीचे जंक्शन आहे.

Chinchwad Bye-Election: निवडणूक निरीक्षकांनी केली मतदान केंद्रांची तपासणी

परिणामी वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांची गैरसोय होत असून (Metro Work Traffic) वाहतूक प्रवाह नियंत्रित करणाऱ्या पोलिस यंत्रणेवरही ताण पडत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.