BBC : बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागाचे सर्वेक्षण; तर अघोषित आणीबाणीचा काँग्रेसचा आरोप

एमपीसी न्यूज : आयकर विभागाने मंगळवारी दिल्ली आणि मुंबईतील ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (BBC) कार्यालयात कथित करचोरी आणि आंतरराष्ट्रीय कर तसेच TDS व्यवहारांशी संबंधित अनियमिततेच्या संदर्भात सर्वेक्षण केले. सकाळी अकराच्या सुमारास सर्वेक्षणाला सुरुवात झाली.

बीबीसी कार्यालयातील प्रवेश बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या सर्वेक्षणाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. आयकर विभागाचे कर्मचारी सध्या बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई या दोन्ही कार्यालयांमध्ये सर्वेक्षण करत असल्याचे सांगण्यात येत आहे. बीबीसीचे मुंबईत ब्युरो आहे.

दरम्यान, काँग्रेसने आयकर विभागाच्या कारवाईला अघोषित आणीबाणी असल्याचे म्हटले आहे.

Talegaon Dabhade : तर इंग्रज भारतात आलेच नसते, उलट मराठ्यांचे घोडे लंडनपर्यंत गेले असते

केजी मार्ग रोडवर असलेल्या बीबीसीच्या भारतीय कार्यालयावर छापा टाकला जात आहे. तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तुम्ही फोन वापरू शकत नाही, असेही आयकर विभागाने तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे.

सर्वेक्षणाचा (BBC )एक भाग म्हणून, प्राप्तिकर विभाग केवळ कंपनीच्या व्यावसायिक परिसराची तपासणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.