Satyam Jewellers : तुमच्या प्रेमाला साथ देईल सत्यम ज्वेलर्सचा दागिना!

एमपीसी न्यूज – शब्द उच्चारताच प्रेमळ, कोमल, तरल मनाच्या पाण्यावर उमटतात (Satyam Jewellers) आणि असंख्य गुलाबी आठवणी आपल्या भोवती फेर धरून नाचू लागतात. प्रेमात…राग, रुसवा, दुरावा, जवळीक, आठवण, सांजवेळ, दिवेलागण, पहाट, आणि चांदण्यांची साथ अशा अनेक गोष्टी सामावून घेण्याची प्रगल्भता आहे.

प्रत्येकाच्या मनात एक गुलाबी कप्पा आहे ह्या आठवणींबद्दल! तळ्याच्या काठी, निसर्गरम्य ठिकाणी, छोट्याशा टेकडीवर एकांतात आपण स्वतः स्वतःशीच, आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर अथवा तिच्या किंवा त्याच्या आठवणीत हा कप्पा अलगद उलगडावा आणि आपण फक्त कप्प्यातल्या छोट्या-मोठ्या, गोड-तुरट आठवणींना कुरवाळत बसावं असं हे प्रेम.

प्रेम म्हणजे …हळुवार तिचा हात हातात घेणं, आपण आणलेल्या नाजूक कारागिरीच्या बांगड्या (Satyam Jewellers) तिच्या नकळत तिच्या हाती भरणं आणि तिचं मंद हसू चटकन डोळ्यात भरून घेणं होय. अथवा ह्या सगळ्यात सुंदरशी अंगठी तिच्या लांबसडक बोटांमध्ये अलगद घालून सातजन्माची साथ अप्रत्यक्षरीत्या मागणं होय. सोनचाफ्यासारखं नाक तिचं एखाद्या हिऱ्यांच्या चमकीनं अजूनच अप्रतिम करणं होय.

प्रेमाला व्यक्त करण्याच्या सीमा तशा नाहीतच आहेत. ते तुम्ही अनेक आणि साध्या-साध्या गोष्टींतून व्यक्त करू शकता. तिला प्रिय असणाऱ्या चहा किंवा कॉफीच्या कट्ट्यावर पहाटे-पहाटे जाऊन तिला चहाचा कुल्लड देऊन, रस्त्याकडेला कुल्फीवाल्याजवळ थांबून तिला कुल्फी खाण्याचा आग्रह करून, सिग्नलला गाडीपाशी सोनचाफ्याचा गजरा विकत घेऊन देऊन, भर उन्हात बर्फाचा गोळा देता देता तिच्या डोक्यावर तिला ऊन लागू नये म्हणून रुमाल किंवा स्कार्फची सावली धरून किंवा तिचं आवडतं पुस्तक तिला अचानक भेट देऊन.

Pimpri News : व्हॅलेनटाईन डे निमीत्त पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भन्नाट ट्वीट करत नागरिकांना सावधानतेचा इशारा

ह्या प्रेमाबद्दल किती बोलावं, काही कारणास्तव प्रिय व्यक्तीपासून दुरावणं आणि तिच्याबद्दलच्या प्रत्येक विचाराला वाट करून देणं, तू माझीच किंवा माझाच आहेस हे वदवून घेणं, आणि तुझ्याशिवाय मला कुणी नाही हे डोळ्यातले पाणी लपवत तिला/त्याला सांगण्याची कसरत म्हणजे प्रेम.

सरतेशेवटी गुलाबी पत्राची, इन्स्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्टची, व्हाट्सएप नंबरच्या अदलाबदलीची, व्हाट्सएपच्या मेसेजची आणि कॉलची आतुरता लागणं म्हणजे प्रेम. आणि हक्काच्या, प्रेमाच्या व्यक्तीला सांगणं की तूच माझा साथिया….म्हणजे प्रेम.

या प्रेमाला ना वयाची मर्यादा, ना क्षण निसटून जाण्याची चिंता. ज्या भावना पहिल्यांदा अनुभवल्या त्याच भावना आयुष्यभर टिकून राहतात यात तीळमात्र शंका नसते. प्रत्यक्षात प्रेम वयासह द्विगुणित होत जातं.

असे कोमल आणि निर्मळ अविर्भाव, जो आयुष्यभर घेऊन चालतो तोच एक समृद्ध व्यक्ती घडतो. प्रेम हे माणसाला समग्र बनवण्यात मदत करतं. तर, प्रेमाच्या क्षणांना उजाळा देत, परत नव्याने प्रेम करायला ‘सत्यम ज्वेलर्स’ उत्तेजित करते.

सत्यम ज्वेलर्स निःस्वार्थ प्रेमाच्या प्रत्येक आठवणीचा, प्रत्येक पदराचा आणि प्रत्येक हळुवार क्षणांचा आदर करते. आणि म्हणूनच ह्या व्हॅलेंनटाईन निमित्त…..घेऊन आलो आहोत साथिया……साथिया….म्हणजे सोने, चांदी, प्लॅटिनम आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची अप्रतिम रेंज आणि व्हरायटी.

ह्या व्हॅलेंनटाईन निमित्त सत्यम ज्वेलर्सच्या निगडी, कृष्णानगर, किंवा चाकणच्या शाखेला भेट द्या आणि आपल्या ‘साथिया’ला द्या अनमोल भेट जी दिल्यानंतर तुमचा व्हॅलेंनटाईन म्हणेल होय, मीच तुझा साथिया!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.