Chinchwad Bye-Election : पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघ (Chinchwad Bye-Election) परिसरात मोठ्या उत्साहात कलाचन गृप कला मंडळाच्या वतीने तसेच वरप्रभ शिरगावकर यांनी चार्ली चॅप्लिनच्या वेषामध्ये मतदार जनजागृती केली. पथनाट्याद्वारेही मतदान जनजागृती केली जात आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्वेता आल्हाट यांच्या सूचनेनुसार शहरातील विविध भागात मतदार जनजागृती करण्यात येत आहे.

कलाचन गृप कला मंडळाच्या वतीने आज चिंचवड विधानसभा मतदारसंघ परिसरातील काळेवाडी तसेच थेरगाव परिसरात गायन आणि पथनाट्याद्वारे गर्दीच्या ठिकाणी तसेच प्रमुख चौक आणि सोसायट्यांच्या परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली. तसेच मतदानाचा संदेश देणाऱ्या ‘चार्ली’ने परिसरातील डॉक्टर, युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, नागरिक यांचे लक्ष वेधून घेत आहे.

नागरिक देखील त्यांच्या कलेला उस्त्फुर्त दाद देत आहेत. निवडणूक विभागामार्फत चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी कलापथके, सांस्कृतिक कार्यक्रम करणारे समूह, महाविद्यालयीन (Chinchwad Bye-Election) विद्यार्थी स्वयंसेवक यांचा सहभाग घेण्यात येत आहे. सार्वजनिक इमारती, रुग्णालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांच्या परिसरात तसेच विविध सोसायट्यांमधून छोट्या- छोट्या कार्यक्रमाद्वारे, पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्व पटवून देण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.