Pune Crime : पुणे पोलिसांचा दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोंढवा व थेऊरगाव परिसरात जुगार अड्ड्यावर छापा मारला असून यात 42 जणांवर कारवाई केली आहे. (Pune Crime) यात पोलिसांनी 74 हजार 133 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पहिला छापा हा 11 फेब्रुवारी रोजी कोंढवा कात्रज रोडवर मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी पाळत ठेऊन बेकायदेशीररित्या  कल्याण मटका येथे पैसे लावून जुगार खेळणाऱ्या 22 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण 54 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपीवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

Satyam Jewellers : तुमच्या प्रेमाला साथ देईल सत्यम ज्वेलर्सचा दागिना!

तर थेऊर गाव येथे सोमवारी (दि.13) छापा टाकण्यात आला. यात पोलिसांनी मोकळ्या जागेत पत्राशेड मध्ये मटका जुगार खेळणाऱ्या 24 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून (Pune Crime) 68 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोंपीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.